रविवार, १५ डिसेंबर, २०१३

करियर टिप्स

 करियर टिप्स

Three-issues-that-should-top-the-IT-agenda-this-year_394x296

झाला कि अभ्यासा .................. घरातील सगळे पालक मुलांच्या अभ्यासाच्या मागे लागतात. परंतु दहावी, बारावी आणि ग्रॅज्युएशन करताना त्या-त्या पातळीवर नेमकं काय करायचं/ अभ्यास करताना नेमका कसा करावा याबाबत थेट 11 टिप्स तुम्हांला देत आहेत.
 
1.कधीही फार तास सलग अभ्यासाला बसू नका. तासभराने दहा मिनिटांचा ब्रेक हवाच.

2. अभ्यासासाठी टाइमटेबल बनवा. त्याचं काटेकोरपणे पालन करण्यासाठी मित्रांना आणि घरी जाहीर करून टाका. म्हणजे ते फॉलो करण्यासाठी घरातल्यांची मदतच होईल.

3. अभ्यास करणं म्हणजे घोकंपट्टी नको. संकल्पना समजून घेऊन अभ्यास केलेला चांगला.

4. एखाद्या गोष्टीमुळे टाइमटेबल फॉलो झलं नसेल तर तसं नोट डाऊन करून ठेवा. ती गोष्ट, धड, मॅथ्स नंत र करायचं आहे हे लक्षात ठेवा.

5. फ्रेश वातावरण असलेल्या ठिकाणी अभ्यासाला बसा.

6. वाचताना महत्त्वाची वाक्य, शब्द अधोरेखीत करून ठेवा. पुन्हा तो धडा चाळताना त्याचा उपयोग होईल. तसंच, दिवसांतला 15 मिनिटांचा वेळ उजळणीसाठी ठेवा.

7. वीकेण्डला स्वत:ची टेस्ट घेऊन मार्कही द्या. अभ्यास कुठपर्यंत पोचलाय हे कळेल.

8. अभ्यास करताना फळं आणि पाणी थोड्या थोड्या वेळाने घेत राहा.

9. दहावीला असलेल्या विद्यार्थ्यांनी सुट्टीत करिअर कौन्सिलरकडून अॅप्टिट्यूट टेस्ट करून घ्यालला हवी. जेणेकरून आपला कल, क्षमता लक्षात येऊन अकरावीला शाखा निवडणठ सोपं जाईल.

10. बारावीला गेलेल्या विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासाक्रमाकडे वळायचं असल्यास त्याची माहिती मिळावयल सुरुवात करा. अभ्यासक्रमांतले बदल याकडेही लक्ष ठेवायला हवं.

11. तसंच, जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनला आहेत त्यांनी आपलं करियर अधिक फोकस्ड ठेवायला हवं. पुढे शिकायचं असल्यास त्याची माहिती मिळावयला हवी. खासगी नोकरी करयाची असल्यास संवाद कौशल्य वाढवायला हवं. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा